प्रतिनिधी / बेळगाव
चोवीस तास पाणी योजनेसाठी बेळगाव शहराची निवड करून जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजना राबविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निवारण करण्याच्यादृष्टीने सीएमडीआर या संशोधन केंद्राच्यावतीने महापालिका आणि पायाभूत सुविधा विभागाच्या अभियंत्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.
महापालिका कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
चोवीस तास पाणी योजनेच्या अभ्यासाची माहिती प्रा. डॉ. नयनतारा एस. एन. यांनी दिली. चोवीस तास पाणी योजना यशस्वी करण्याच्यादृष्टीने कोणत्या उपाययोजना राबविण्याची गरज आहे. याची माहिती प्रा. डॉ. पुष्करनी पंचमुखी यांनी दिली. त्याचप्रमाणे डॉ. नारायण बिल्लवा यांनी चोवीस तास पाणी योजना राबविल्यानंतर पाण्याचा दर्जा आणि पाणीपुरवठा नियोजनाबाबतची माहिती दिली.
महापालिकेच्या अभियंत्यांसह पायाभूत सुविधा आणि एलऍण्डटी कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.