वृत्तसंस्था/ पुणे
देशातील राष्ट्रीय प्रमुख हॉकी प्रशिक्षकांसाठी हॉकी इंडियातर्फे एचपीडी हर्मन क्रूस यांनी हॉकी कार्यशाळा आयोजित केली होती. हॉकी या क्रीडा प्रकारातील नव्या नियमांची माहिती प्रशिक्षकांना असावी तसेच भारतीय हॉकी क्षेत्राचा विकास तळागाळापासून होणे आवश्यक असल्याने ही कार्यशाळा घेण्यात आली. सध्या वरिष्ठ महिलांची राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू आहे.
अलिकडे देशामध्ये हॉकी प्रशिक्षक मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. दरम्यान त्यांच्या हॉकी प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याची गरज असून या कार्यशाळेमध्ये प्रमुख हॉकी प्रशिक्षकांना तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. आता हॉकी प्रमाणे अॅथलेटिक्स क्षेत्रातही अशा कार्यशाळेची गरज असल्याचे क्रूस यांनी सांगितले.









