प्रतिनिधी/ बेळगाव
वकिलांनी एकाग्रतेने पक्षकारांशी संवाद साधून खटल्याच्या सकारात्मक निकालासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. यासाठी वकिलांना मार्गदर्शन करण्यासाठी मेडिटेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा दोन दिवस चालणार असून त्यामध्ये वकिलांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यजिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश एल. विजयलक्ष्मी देवी यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुधीर चव्हाण उपस्थित होते. दरवर्षी वकिलांसाठी ही मेडिटेशन कार्यशाळा आयोजित केली जाते. या कार्यशाळेमध्ये बेंगळूरहून आलेले प्रशिक्षक भरतकुमार मेहता, ज्यो जोसेफ वकिलांना मार्गदर्शन करणार आहेत.
बेंगळूर मेडिटेशन सेंटरच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव कायदा सेवा प्राधिकार आणि बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहरासह तालुक्यातील न्यायालयांमधील वकिलांना मार्गदर्शन केले जाणार आहे. बेळगाव शहरातील एकूण न्यायालयांमध्ये अठरा वकील सध्या कार्यरत आहेत. ते पक्षकारांच्या घरी जाऊन त्यांना मार्गदर्शन करून तो खटला निकालात काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, पक्षकारांना कशाप्रकारे आपण समजावून सांगितले पाहिजे, याची माहिती बेंगळूरहून आलेले प्रशिक्षक देणार आहेत. कायदा सेवा प्राधिकारचे सेक्रेटरी पी. मुरलीमोहन रे•ाr यांनी ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.









