मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यात उबाठाला महायुतीचे धक्के सुरूच आहेत. गुरुवारी राठीवडे येथील उबाठा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मालवण येथील महायुती पदाधिकारी यांच्या मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. खा. नारायण राणे, मंत्री उदय सामंत, महायुतीचे उमेदवार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे यांनी प्रवेशकर्ते यांचे स्वागत केले.विकासाचा दृष्टिकोन ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार ही त्यांनी व्यक्त करण्यात आला.यावेळी स्वप्नजा मेस्त्री, सुनील मेस्त्री, जागृती धुरी, विनायक सावंत, संतोष सावंत, विलास पांचाळ आदी उबाठा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.यावेळी शिवसेना पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर, विधानसभा प्रमुख बबन शिंदे, संघटक महेश कांदळगांवकर, रुपेश पावसकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, महेश राणे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, मधुकर चव्हाण, राजेश हाटले यांसह महायुती पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleकोल्हापुरात महाराष्ट्र-कर्नाटक सीमा समन्वय बैठक
Next Article या निवडणूकीत इतिहास घडविणार – विशाल परब









