वार्ताहर/ कुडाळ
निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना पक्ष प्रवेश सत्र मात्र जोरात सुरु आहे. कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी-म्हारसेवाडी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते संतोष परब यांनी अनेक कार्यकर्त्यासह मंगळवारी सकाळी कुडाळ येथील भाजप कार्यालयात महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. नीलेश राणे यांनी प्रवेशकर्त्याचे पक्षात स्वागत केले. शिवसेना उबाठा पक्ष सोडून या कार्यकर्त्यानी शिवसेना शिंदे पक्षाचा धनुष्यबाण हाती घेतला. नीलेश राणे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आपण पक्ष प्रवेश करीत असल्याचे प्रवेशकर्त्यानी सांगितले.महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी लाडकी बहीण योजना, एसटी बसमध्ये 50 टक्के सवलत तसेच ज्येष्ठ नागरी, बेरोजगार तरुण वर्गासाठी योजना आणल्या. त्यामुळे आपण महायुती सरकार सोबत आहोत असे मत प्रवेश कर्त्यांनी व्यक्त केले.यावेळी भाजप कुडाळ तालुका मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, विजय म्हाडीक, पं. स. माजी सभापती अभय परब, अँड विवेक मांडकुलकर,माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे, तेंडोली माजी सरपंच मंगेश प्रभू,अनंत गडकरी, गणू गोलम आदी उपस्थितीत होते.प्रवेश कर्त्यामध्ये साधना परब, जगन्नाथ गावडे, जागृती गावडे, दिनेश राऊळ, विजया साळुंखे, मनीषा साळुंके, संतोष राऊळ, धोंडी गावडे, प्रणाली राऊळ, सुरेश राऊळ, संस्कृती परब, दीपक साळुंखे, विघ्नेश साळुंखे, शेखर साळुंखे, मुकुंद राऊळ, मनाली राऊळ, सुमन राऊळ, चंद्रकांत राऊळ, सोनाक्षी राऊळ, अंकुश राऊळ, लक्ष्मी राऊळ, अभी सावंत आदी प्रवेशकर्त्यानी प्रवेश केला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









