ऑनलाईन पद्धतीने सुविधा, कामगारांना दिलासा
► प्रतिनिधी / बेळगाव
बांधकाम कामगारांना आपल्या नावाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने कोठूनही करता येणार आहे. ग्रामवन, बेळगाव वन केंद्रातून मूळ कागदपत्र आणि बायोमेट्रिक ठसे देऊन नोंद करता येणार आहे.
जिल्ह्यात 2 लाख 30 हजारहून अधिक बांधकाम कामगारांची संख्या आहे. मात्र अनेक कामगारांची नोंद नाही. तर दुसरीकडे बोगस कामगारांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पात्र असलेल्या कामगारांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. अशा परिस्थितीत कामगारांना कोठूनही आता ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
कामगार कल्याण मंडळाकडून कामगारांच्या मुलांना विवाहासाठी निधी, लॅपटॉप, शिष्यवृत्ती आणि इतर सुविधा राबविण्यात आल्या आहेत. त्याबरोबर कामगारांना दैनंदिन साहित्याचे किट दिले जातात. मात्र अनेक कामगारांची नोंद नसल्याने या सर्व सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. अशा कामगारांना सद्यस्थितीत असलेल्या ठिकाणाहून ऑनलाईन पद्धतीने कामगार असल्याची नोंद करता येणार आहे. त्यामुळे कामगारांनाही दिलासा मिळाला आहे.









