प्रतिनिधी, खेड
तालुक्यातील आवाशी येथील कंपनीतील शेडच्या छतावरून पडून परप्रांतीय कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी कामगारांचे नाव समजू शकले नाही.जखमी कामगारास उपारासाठी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत येणारा माल उन्हाळ्यात उघड्यावर ठेवला जातो. पावसाळा जवळ येवून ठेपल्याने तो सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनी आवारातीला मोकळ्या शेडमध्ये त्याची साठवणूक करण्यासाठी शेडच्या दरूस्तीचे काम हाती घेतले आहे. शेडवरील जुने पत्रे काढून नवीन पत्रे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, रासायनिक कारखान्यातील जुने पत्रे पूर्णत: जीर्ण झाल्याने त्यावर काम करत असताना पत्रा अचानक तुटल्याने 50 फूट उंचावरू काम करणारा कामगार जमिनीवर कोसळला.
जखमी कामगारास उपारासाठी चिपळूण येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले . मात्र, उंचावर काम करणाऱ्या कामगाराला सुरक्षा साधने पुरवली गेली होती का? ठेका घेणारा ठेकेदार परवानधारक आहे का? उंचावर काम करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनी अनुमती होती का? सेफ्टी बेल्ट वा इतर साधने उपलब्ध करून दिली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकारणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.