ठाकरे शिवसेना कार्यालयात संविधान दिन पुजन कार्यक्रम संपन्न
वेंगुर्ले (वार्ताहर)-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अभ्यास व डोळसपणे त्यावेळी लोकशाही मजूबुतीसाठी केलेले संविधान हे मानव जातीसाठी प्रेरक आहे. आणि त्यास आज ७५ वर्षे होत आहेत. एवढ्या वर्षाच्या वाटचालीत ते आपल्याला मार्गदर्शक ठरत आहे. संविधान हे देशाच्या लोकशाही बरोबरच सर्वसमान्य जनतेच्या मूलभूत अधिकाराचे रक्षण करत आहे . हे संविधान वाचलं पाहिजे. देशाला अजून प्रगतीपथावर कसे घेऊन जाता येईल यासाठी काम केले पाहिजे. असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी केले.
येथील ठाकरे शिवसेनेच्या वेंगुर्ला तालुका मध्यवर्ती कार्यालयात संविधानाचे पुजन व मार्गदर्शन कार्यक्रम तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांत उपतालुका प्रमुख उमेश नाईक, युवासेना तालुका प्रमुख पंकज शिरसाद, तुळस विभाग प्रमुख संदिप शरद पेडणेकर, उपशहर प्रमुख शैलेश परूळेकर, दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर, श्रीकांत घाटे. गजानन गोलतकर, सुनील बोवलेकर वाल्मिक कुबल, हेमंत मलबारी, सुरेश उर्फ अण्णा वराडकर, हेमंत राणे, श्रीधर पंडीत, दिलीप राणे आदींचा समावेश होता.









