पावसाळ्यात वाहतुकीचा प्रश्न येणार ऐरणीवर; धरणाशेजारील कास पठारकडे जाणाऱ्या रस्त्याला पर्यायी रस्ता निर्माण करण्याची नागरीकांतुन मागणी
कास वार्ताहार
सातारा शहराला मुबलक पाणी साठा उपलब्ध व्हावा म्हणून कास तलावच्या धरणाची उंची वाढविण्याचे काम गेल्या चार वर्षापासुन सुरु होते ते आता पुर्ण झाले असुन धरणा शेजारील नवीन वाहतुकीच्या पुलाचे बांधकामही पुर्णत्वाकडे आले आहे मात्र धरणात बाधीत झालेल्या रस्त्याची अद्याप निर्मिती झाली नसल्याने पावसाळ्यात वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याचे दिसुन येत आहे
कास बामणोली धावली जुंगटी परिसरात जाण्यासाठी कास धरणाशेजारून एकमेव प्रमुख रस्ता असुन हा मुख्य रस्ता कास धरणाची उंची वाढविल्याने बाधीत झाला आहे त्यामुळे गेली चार वर्ष पावसाळ्यात वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे या वर्षापासुन धरणात पुर्ण क्षमतेन पाणी साठवले जाणार आसल्याने उर्वरीत बाधीत रस्ताही पाण्यात जाणार असुन पर्यायी नवीन रस्ता अद्याप निर्माण न केल्याने वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे
कास पठारवरून बामणोलीकडे जाणारा मुख्य रस्ता धरणात बाधीत झाल्याने त्याला त्याच्या बाजुने पर्यायी रस्त्याची निर्मीती होण्यासाठी कास ग्रामस्थांसह बामणोली भागातील नागरीकांनी वारंवार मागणी केली असतानाही प्रशासनाकडुन अश्वासनांची फक्त खैरात देत जाणीव पूर्वक दुर्लक्ष होताना दिसत असल्याने व काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्याने अनं रस्त्याची निर्मीती होत नसल्याने भागातील जनतेतुन संताप व्यक्त होत आहे
कास पुष्प पठारावर फुलांच्या हंगाम काळात सर्वाधीक वाहने कासपठार कडे येत असतात त्यावेळी कास पठारवरील वाहतुकीला पर्यायी वाहतुक रस्ता म्हणुन घाटाई वांजळवाडी ते कास तलाव मार्गावरील आठशे मिटर डांबरीकरणापासून वंचित राहीलेल्या रसत्याचे डांबरीकरण झाल्यास पठारवरील वाहतुकीस पर्यायी रस्ता उपलब्ध होऊन वाहतुक सुरळीत होऊ शकते त्यामुळे या मार्गावरील मातीच्या रस्त्याचे डांबरीकरण त्वरित करावे अशीही मागणी होत आहे
धरणाशेजारीला जुन्या वाहतुकीच्या पुलावरून पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जात असल्याने दरवर्षी पावसाळ्यात वाहतुकीचा खेळखंडोबा होत होता मात्र या ठिकाणी नवीन मोठ्या पुलाचे काम पुर्णत्वाकडे आल्याने पावसाळ्यातील समस्या या वर्षापासुन दुर होणार आहे









