रत्नागिरी प्रतिनिधी
पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हयात जी कामे सुरु आहेत ती कामे संबधित यंत्रणेने निर्धारित वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कार्यकारणी समितीची आढावा बैठक पार पडली.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, जिल्हयात 6 ब तर 91 क वर्गाची पर्यटन स्थळे असून या पर्यटन स्थळांना पर्यटकांच्या दृष्टीने अधिक आकर्षक व सुंदर बनविण्यासाठी देण्यात आलेल्या निधीचा पुरेपूर वापर करण्यात यावा. निधी शिल्लक राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन वृध्दीच्या अनुषंगाने अशासकीय सदस्यांच्या सूचनाही एकून घेतल्या. तसेच सन २०२३-२४ या वर्षात पर्यटनाच्या दुष्टिने शासनास सादर केलेल्या योजनांचा सविस्तर आढावाही घेतला.
तत्पूर्वी पर्यटन वाढीच्या अनुषंगाने, सन २१-२२ व २२-२३ या वित्तीय वर्षात, संबधित पर्यटन स्थळाला शासनाकडून देण्यात आलेल्या निधीचा व प्रलंबित कामाचा आढावा जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये यांनी घेतला. या बैठकीसाठी परिविक्षाधीन आयएएस अधिकारी डॉ. जास्मीन, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळये, रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्यासह संबधित तालुक्याचे तहसिलदार दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.