परिसरातील जुनी अन् मोठी झाडे अबाधित ठेवण्याचे काटेकोर नियोजन
► प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतींचे बांधकाम जलद गतीने सुरू होणार असून, या कामादरम्यान परिसरातील जुनी व मोठी झाडे अबाधित ठेवण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी जिल्हाधिकारी रोशन यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसराची पाहणी केली. या ऐतिहासिक इमारतीचे पुरातन वैभव अबाधित ठेऊन व जैविक संतुलनाचा समतोल राखून काम पूर्ण करावे अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
नवीन इमारतीत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रशासकीय कार्यक्षमतेत मोठी वाढ होईल आणि नागरिकांना अधिक सुसज्ज सेवा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.









