प्रतिनिधी,कोल्हापूर
पाण्याचा खजिना ते कोळेकर तिकटी येथे अमृत योजनेतून पिण्याची पाईपलाईन टाकण्याच्या कामास सोमवारपासून सुरवात झाली आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. केएमटी बससह सर्व वाहनांना पर्यायी मार्गाने वाहतुक करावी लागत आहे.
पाण्याचा खजिना ते कोळेकर तिकटी येथील पिण्याची पाईपलाईन 30 ते 40 वर्षापूर्वीची आहे. यामुळे गळती लागून पाणी वाया जात आहे. शिवाय परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाला आहे. यामुळे महापालिकेने अमृत योजनेतून येथे नव्याने पाईपलाईन टाकली जात आहे. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते रविवार येथील कामाचे उद्घाटन झाले. पाणीपुरवठा विभागाने सोमवारी सकाळी येथील काम सुरू केल्याने पाण्याचा खजिना ते कोळेकर तिकटी येथील रस्ता बंद झाला आहे.
केएमटी मार्गात बदल
पाण्याचा खजिना ते कोळेकर तिकटी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कळंबा, आर.के.नगर, पाचगांव, चुये, येवती, वडकशिवाले बाचणी, सुर्वेनगर, राजोपाध्येनगर, जिवबानाना जाधव पार्क, आपटेनगर/कळंबा, राजोपाध्येनगर-बोंद्रेनगर या मार्गावर धांवणाऱ्या बसेस बिंदूचौकपर्यंत नियमितमार्गे धांवतील. बिंदू चौक येथून पुढे कॉर्मर्स कॉलेज उमा टॉकीज गोखले कॉलेज – हॉकी स्टेडीयम संभाजीनगर पुढे नियमित मार्गे धावतील. येताना सर्व बसेस लाड चौक येथून नियमित मार्गे पुढे मार्गस्थ होतील. यामुळे श्री शाहू मैदान कोळेकर तिकटी शाहू बँक नंगीवाली चौक-रेसकोर्स नाका या बसस्टॉपवरील प्रवाशांनी गोखले कॉलेज हॉकी स्टेडियम येथून बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केएमटीने केले आहे.
न्यू महाद्वार रोडवर वाहतुकीची कोंडी
पाण्याचा खजिना ते कोळेकर तिकटी रस्ता बंद झाल्यामुळे पर्यायी शिवाजी पेठेतील हिंद तरूण मंडळ ते बिनखांबी गणेश मंदिर या न्यू महाद्वार रोडवर सोमवारी वाहतुकीची कोंडी झाली. केएमटी बससह चारचाकी, दुचाकी वाहनांची गर्दीमुळे पदचाऱ्यानाही येथून जाणे कठीण झाले आहे.
Previous Articleजो बायडेन यांच्या हत्येचा कट, भारतीय वंशाच्या तरुणाला अटक
Next Article कळंब्यात घरफाळा,पाणीपट्टी वाढ; ग्रामपंचयतीचा निर्णय









