ठाकरे शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
संगमेश्वर :
संगमेश्वर चिपळूण मतदार संघामध्ये कमी वेळेमध्ये मतदारांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे प्रशांत यादव यांना चांगल्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी झटून काम करावे, दूध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेले समाजकार्य शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी व्यक्त केले. अंबवली येथे शंभूराजे दूध डेअरीच्यावतीने आयोजित प्रचार समेत ते बोलत होते.








