रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे अखेर मुजवण्याचे काम सुरू
सातारा : सातारा शहराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानासमोर रस्त्यावर पडलेले मोठे खड्डे अखेर मुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सातारा नगरपालिका प्रशासनाने मंगळवारी (दि.१४ ऑक्टोबर) सकाळपासून या ठिकाणी रस्ता दुरुस्तीची मोहीम हाती घेतली. अनेक दिवसांपासून या भागातील रहिवासी आणि वाहनचालक रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रस्त होते.
मात्र, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर असल्याने हा विषय विशेष चर्चेत आला होता. त्यानंतर नगरपालिका यंत्रणा सक्रीय झाली असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.रहिवाशांनी या कामाचे स्वागत केले असून शहरातील इतर भागांतील खड्ड्यांचीही अशीच दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.








