कार्यशाळेत जिल्हाधिकाऱयांनी केली सूचना : अडचणी आल्यास वरिष्ठांशी संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
विधान परिषद निवडणूक ही निवडणूक आयोगाच्या मार्गसूचक तत्त्वानुसार झाली पाहिजे. मुक्त वातावरणात ही निवडणूक पार पडली पाहिजे. मतदान केंद्रात केवळ एकाच मतदाराला प्रवेश द्या. मतदानवेळी अधिकाऱयांनी आपले कर्तव्य कटाक्षपणे बजावावे. कोणत्याही अडचणी आल्यास वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधून त्या दूर कराव्यात, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
जिल्हा पंचायतीच्या सभागृहात कर्मचाऱयांना कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना तसेच कर्मचाऱयांना ही निवडणूक अत्यंत शांततेत आणि निवडणूक आयोगाच्या मार्गसुचीनुसार पार पडली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने काळजी घ्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीमध्ये निवडणूक पक्रिया ही सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. या काळात कोणत्याही कर्मचाऱयांकडून चूक झाली तर ती कधीच माफ न करणारी असते. बऱयाचवेळा कर्मचाऱयांना निलंबित केले जाते. तेंव्हा आता होणारी वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये प्रत्येकाने सक्रिय आणि अत्यंत काळजीपूर्वक काम करावे, अशी सूचना निवडणूक प्रशिक्षणाधिकारी एन. व्ही. शिरगावकर यांनी केली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी ज्या कर्मचाऱयांची निवड करण्यात आली आहे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शुक्रवारी जिल्हा पंचायत सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी कर्मचाऱयांना मार्गदर्शन केले आहे. एरवी कोणतीही चूक झाली तर ती दुरुस्त करता येते. मात्र निवडणुकीच्या काळात लहान चुकही त्रासाची ठरू शकते. केवळ त्या कर्मचाऱयांपुरती मर्यादीत नसते तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेला ती मारक ठरते. तेंव्हा प्रत्येकाने निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन करत काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
विधान परिषदची ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेतली जाणार आहे. तेंव्हा नोंद ठेवताना योग्यप्रकारे ठेवावी. मतपत्रिका देताना देखील क्रमांक योग्यप्रकारे लिहावा. कोणीही अडचणीत येवू नये याची दखल प्रत्येक कर्मचाऱयाने घ्यावी, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी साऱयांनी प्रयत्न करावेत. कोणतीही अडचण आल्यास वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधून त्यावर तातडीने तोडगा काढावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या कार्यशाळेवेळी जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, बिम्स्च्या सीईओ अफरीन बानु बळ्ळारी, मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
कोविड मार्गसूचींचे पालन करा…
मतदान व मतमोजणी दरम्यान कोविड मार्गसुचींचे पालन प्रत्येकाने केले पाहिजे. मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतर पाळलेच पाहिजे. मतदारांनीसुद्धा हे नियम पाळणे बंधनकारक आहे. तेंव्हा अधिकाऱयांना संबंधित मतदारांना याची कल्पना द्यावी. जे विकलांग मतदार आहेत त्यांना मदत करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. विधान परिषद निवडणूक ही बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिह्यासाठी होत आहे. मतदानाबाबतची गुप्तता पाळणे बंधनकारक असून सर्व कर्मचाऱयांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले
आहे.









