सर्वात मोठ्या चॉकलेट निर्मात्याची कहाणी
हॉलिवूडमध्ये कमी वयात स्वत:च्या अभिनयाद्वारे मोठा चाहतावर्ग निर्माण केलेल्या टिमोथी शॅलमेटचा नवा चित्रपट येतोय. ‘वोंका’ असे नाव असलेल्या या चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 15 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

पॉल किंग यांच्याकडून दिग्दर्शित चित्रपटात टिमोथीने जगातील सर्वात मोठा आविष्कारक, जादूगार आणि चॉकलेट मेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विली वोंका यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. वोंका यांच्यावर यापूर्वीही अनेक चित्रपट निर्माण करण्यात आले आहेत. 1964 मध्ये ‘चार्ली अँड द चॉकलेट’ या कादंबरीमुळे वोंका यांना प्रसिद्धी मिळाली होती. ही कादंबरी रोनाल्ड डहल यांनी लिहिली होती.
वोंका यांच्या चॉकलेट निर्मितीच्या कौशल्याबद्दल अनेकांना पोटशूळ होता. स्वत:चे चॉकलेट शॉप सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते. इतरांकडून निर्माण करण्यात आलेल्या अडचणी दूर करत ते कशाप्रकारे स्वत:चे स्वप्न पूर्ण करतात हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. चित्रपटात टिमोथी यांच्यासह ओलिविया कोलमॅन, कीगन माइकल की, सॅली हॉकिन्स आणि रोवन एटकिंसन यासारखे दिग्गज कलाकार देखील दिसून येतील. 27 वर्षीय टिमोथी हा अमेरिकन-फ्रेंच अभिनेता आहे. ‘ड्यून’ या चित्रपटातील त्याची भूमिका गाजली होती.









