स्वत:चे शरीर पुन्हा निर्माण करण्याची क्षमता
तारुण्य टिकविण्यासाठी लोक काहीही करण्यास तयार असतात. परंतु एक जीव स्वत:च्या अवयवांना याकरता बदलून टाकतो. हा प्रकार तो स्वत:च करतो आणि ते देखील कुणाच्या मदतीशिवाय. या जीवाचे नाव एक्सोलोल असून तो मेक्सिकन सॅलामँडर आहे. तेथील दोन सरोवरांमध्ये हा प्राणी आढळून येतो. याची प्रजाती गंभीर स्वरुपात विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. प्रदूषण आणि इतर प्राण्यांचे हल्ले याकरता कारणीभूत आहेत. माणसाचा हात-पाय कापला गेला तर तेथे दुसरा अवयव निर्माण होत नाही. हृदयात समस्या उद्भवल्यास ते बदलले जाऊ शकते. मानवी मेंदू आणि कण्याचे हाड बदलता येत नाही. तसेच ते पुन्हा विकसित केले जाऊ शकत नाही. परंतु या विचित्र जीवाचे वैशिष्ट्या म्हणजे तो मेंदू, कण्याचे हाड, हृदय आणि हातपाय पुन्हा निर्माण करू शकतो. एक्सोलोलमध्ये स्वत:च्या मेंदूच्या काही हिस्स्यांना पुन्हा निर्माण करण्याची क्षमता असल्याचे वैज्ञानिकांनी 1964 मध्ये शोधून काढले होते. हा प्राणी हृदय, हातपाय देखील पुन्हा निर्माण करू कशतो. याच्या मेंदूचा मोठा हिस्सा वगळल्यास तो मेदू देखील पुन्हा विकसित करत असतो.
एक्सोलोल मेंदूच्या पेशींना पुन्हा विकसित करत त्यादरम्यान संबंध देखील स्थापित करतो. एक्सोलोलला हे कशाप्रकारे साध्य होते हे जाणून घेण्यासाठी त्याच्या मेंदूचा नकाशा तयार करण्यात आला. त्यानंतरच हा मेंदू कशाप्रकारे पुन्हा विकसित करू शकतो हे समजू शकले. मेंदूच्या विविध हिस्स्यांच्या विविध पेशी वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतात. वैज्ञानिकांनी याच्या सिंगल सेल आरएनए सिक्वेंसिंगची प्रक्रियाही पाहिली. वैज्ञानिकांनी याच्या मेंदूतील सर्वात मोठा हिस्सा टेलेनसिफेलॉनचे अध्ययन केले. टेलेनसिफेलॉन मानवी मेंदूचाही मोठा हिस्सा असतो. याच्या आत नियोकॉटेक्स असते, जे कुठल्याही प्राण्याच्या वर्तनासाठी कारणीभूत ठरत असते. या अध्ययनातून टेक्सोलोल हा स्वत:च्या मेंदूला विविध टप्प्यांमध्ये विकसित करत असल्याचे दिसून आले. वैज्ञानिकांनी याच्या मेंदूच्या टेलेनसिफेलॉनच्या एका मोठ्या हिस्स्याला बाहेर काढले, यानंतर 12 आठवड्यांनी एक्सोलोलने स्वत:च्या मेंदूला दर आठवड्याला हळूहळू विकसित केल्याचे दिसून आले. पहिल्या टप्प्यात प्रोजेनिटर सेल्स वेगाने वाढले, हे सेल्स घाव भरण्याचे काम करतात. दुसऱ्या टप्प्यात प्रोजेनिटर सेल्स न्यूरोब्लास्ट्समध्ये अंतर निर्माण करतात. तिसऱ्या टप्प्यात न्यूरोब्लास्ट्स वेगवेगळ्या न्यूरॉन्समध्ये रुपांतरित होतात. नव्या न्यूरॉन्सनी मेंदूच्या जुन्या हिस्स्यासोबत संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केलेली असते. ही क्षमता अन्य कुठल्याही प्राण्यात आतापर्यंत दिसून आलेली नाही.









