वृत्तसंस्था/ बॅकॉक
2027 साली होणाऱ्या फिफाच्या महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद ब्राझीलला मिळाले आहे. फिफाच्या झालेल्या कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये ही घोषणा करण्यात आली.
फिफाची पूर्ण वेळ सदस्य असलेल्या देशांनी या आगामी स्पर्धेसाठी यजमना पदाची निवड करण्याकरीता मतदान केले. या मतदानामध्ये ब्राझीलला सर्वाधिक मते मिळाली. पहिल्यांदाच महिलांच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या यजमान पदासाठी दक्षिण अमेरिकन देशाची निवड करण्यात आली. शुक्रवारी यजमानपदासाठी झालेल्या मतदानामध्ये ब्राझीलने प्रतिस्पर्धी देशाचा 119-78 अशा गुणानी पराभव केला. अमेरिका आणि मेक्सिको यांनी गेल्या महिन्यात यजमनापदाच्या शर्यतीतून माघार घेतली होती. त्यानंतर या शर्यतीमध्ये बेल्जियम, नेदरलँड्स आणि जर्मनी यांचा समावेश होता.









