वृत्तसंस्था / राऊरकेला
हॉकी इंडियाने आयोजिलेल्या हॉकी लीगचा फायदा निश्चितच भारतीय महिला हॉकी संघाला होईल. तसेच भारतीय हॉकीचा दर्जा सुधारण्यास मदतही मिळेल, असे प्रतिपादन भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंगने केले आहे.
नजीकच्या काळामध्ये भारतीय हॉकी क्षेत्राला गतवैभव प्राप्त होईल. दरम्यान पुरुषांच्या होणाऱ्या हॉकी लीग स्पर्धेत एकूण 8 संघांचा समावेश राहिल. तर पहिल्यांदाच हॉकी लीग स्पर्धा यावेळी घेतली जाणार असून त्यामध्ये 6 संघांचा समावेश राहिल. भारतीय हॉकी क्षेत्राच्या 50 वर्षांच्या इतिहासामध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत पाठोपाठ कास्यपदक मिळविण्याचा विक्रम केला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाला हे यश हॉकी लीग स्पर्धेमध्ये मिळाल्याचे हरमनप्रित सिंगने म्हटले आहे. हॉकी लीग स्पर्धेच्या इतिहासामध्ये हरमनप्रित सिंग हा सर्वात महागडा हॉकीपटू ठरला आहे. आगामी हॉकी लीग स्पर्धेसाठी सोर्मा हॉकी क्लबने हरमनप्रित सिंगला 78 लाख रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे.









