दक्षिण आफ्रिकेत आयोजन, 10 संघांचा समावेश, भारताचा पहिला सामना पाकशी
वृत्तसंस्था/ केपटाऊन
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाची महिलांची ‘टी20’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धा शुक्रवार 10 पासून रंगणार असून 26 पर्यंत चालणार आहे. 10 संघ त्यात किताबासाठी झुंजणार आहेत. यावेळी या स्पर्धेचे यजमानपद दक्षिण आफ्रिका भूषवत आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचला होता, मात्र अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन घडविण्याची अपेक्षा हरमनप्रीत कौर यांचा संघ बाळगून आहे. या संघात फिरकी व वेगवान गोलंदाजी यांचे चांगले मिश्रण असून त्यात दिप्ती शर्मा, रेणुका सिंग व राधा यादव यांचा समावेश होतो. तर हरमनप्रीत कौर, स्मृती मनधाना, शेफाली वर्मा या खेळाडू फलंदाजीत मुख्य आधारस्तंभ आहेत. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
गट 1 : ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका
गट 2 : इंग्लंड, भारत, आयर्लंड, पाकिस्तान, वेस्ट इंडिज
स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक
10 फेब्रुवारी – दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका (केपटाऊन)
11 फेब्रुवारी – वेस्ट इंडिज वि. इंग्लंड (पार्ल)
11 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड (पार्ल)
12 फेब्रुवारी – भारत वि. पाकिस्तान (केपटाऊन – सायंकाळी 6.30)
12 फेब्रुवारी – बांगलादेश वि. श्रीलंका (केपटाऊन)
13 फेब्रुवारी – आयर्लंड वि. इंग्लंड (पार्ल)
13 फेब्रुवारी – दक्षिण आफ्रिका वि. न्यूझीलंड (पार्ल)
14 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश (गायबेरा)
15 फेब्रुवारी – वेस्ट इंडिज वि. भारत (केपटाऊन – सायंकाळी 6.30 वा.)
15 फेब्रुवारी – पाकिस्तान वि. आयर्लंड (केपटाऊन)
16 फेब्रुवारी – श्रीलंका वि. ऑस्ट्रेलिया (गायबेरा)
17 फेब्रुवारी – न्यूझीलंड वि. बांगलादेश (केपटाऊन)
17 फेब्रुवारी – वेस्ट इंडिज वि. आयर्लंड (केपटाऊन)
18 फेब्रुवारी – इंग्लंड वि. भारत (गायबेरा – सायंकाळी 6.30 वा.)
18 फेब्रुवारी – दक्षिण आफ्रिका वि. ऑस्ट्रेलिया (गायबेरा)
19 फेब्रुवारी – पाकिस्तान वि. वेस्ट इंडिज (पार्ल)
19 फेब्रुवारी – न्यूझीलंड विऊद्ध श्रीलंका (पार्ल)
20 फेब्रुवारी – आयर्लंड वि. भारत (गायबेरा – रात्री 10.30 वा.)
21 फेब्रुवारी – इंग्लंड वि. पाकिस्तान (केपटाऊन)
21 फेब्रुवारी – दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश (केपटाऊन)
23 फेब्रुवारी – उपांत्य फेरीतील पहिला सामना (केपटाऊन)
24 फेब्रुवारी – उपांत्य फेरीतील दुसरा सामना (केपटाऊन)
26 फेब्रुवारी – अंतिम फेरीतील सामना (केपटाऊन)









