वृत्तसंस्था/ भोपाळ (आयर्लंड)
येथे सुरू असलेल्या 20 व्या कुमार सुरेंद्र सिंग स्मृती नेमबाजी स्पर्धेत हरियाणाची 20 वर्षीय महिला नेमबाज मनू भाकर दुहेरी सुवर्णपदकाची मानकरी ठरली.
मनू भाकरने 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत महिला आणि कनिष्ठ महिलांच्या गटात प्रथम स्थानासह दोन सुवर्णपदके मिळविली. महिलांच्या विभागात मनू भाकरने 263.9 गुणांसह सुवर्णपदक मिळविले. कौरने 260.5 गुणांसह रौप्यपदक, हरियाणाच्या राधिका तन्वरने कांस्यपदक घेतले. कनिष्ठ महिलांच्या विभागात मनू भाकरने 249 गुण नोंदवित सुवर्णपदक मिळविले. उत्तरप्रदेशच्या युविका तोमरने रौप्यपदक आणि लक्षिताला कांस्यपदक मिळाले. युवा गटात शिखा नरवालने सुवर्णपदक, लक्षिताने रौप्यपदक घेतले. महिलांच्या सांघिक 10 मी. पिस्तुल नेमबाजीत उत्तरप्रदेशने सुवर्ण, हरियाणाने रौप्य आणि महाराष्ट्राने कांस्यपदक मिळविले.









