वृत्तसंस्था / हैद्राबाद
येथील प्रसिद्ध असलेल्या हुसेन सागर तलावामध्ये देशात पहिल्यांदाच अस्मिता महिलांची लीग नौकानयन स्पर्धा बुधवार दि. 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेला भारतीय शासनाच्या खेलो इंडिया मिशनकडून चांगलाच पाठिंबा मिळाला आहे.
सदर स्पर्धा महिलांसाठी असून देशात पहिल्यांदाच भरविली जात आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांचा समावेश राहिल. भोपाळ वावेस क्विन, चेन्नाई रेनीस, कोचीन क्विन्स, कटक रोयिंग, डेक्कन क्विन-पुणे, हैद्राबाद क्विन, कोलकाता रोअर्स, लुधियाना या संघामध्ये जेतेपदासाठी चुरस राहिल. सदर स्पर्धा 19 तसेच 23 वर्षांखालील महिलांच्या वयोगटात घेतली जाणार असून एकूण सुमारे 250 स्पर्धक सहभागी होणार आहेत.









