वृत्तसंस्था/ रांचीत
27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान येथे होणाऱ्या 6 संघांच्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत विजेत्याला देण्यात येणाऱ्या चषकाचे अनावरण मोठ्या थाटात करण्यात आले.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन तसेच आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष इक्रम यांच्या हस्ते चषकाचे तसेच स्पर्धा बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या स्पर्धेमध्ये यजमान भारत, जपान, दक्षिण कोरिया, चीन, मलेशिया आणि थायलंड हे संघ सहभागी होणार आहेत.









