वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेंगळूरच्या भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या केंद्रामध्ये (साई) येथे सोमवारपासून सुरू होणाऱ्या कनिष्ठ महिला राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी हॉकी इंडियाने रविवारी 41 सदस्यांची निवड केली आहे.
2023 च्या कालावधीत झालेल्या विविध राष्ट्रीय स्पर्धांतील कामगिरीच्या निकषावर या सराव शिबिराकरीता 41 सदस्यांची निवड करण्यात आली आहे. हे सराव शिबिर महिनाभर चालणार असून 6 फेब्रुवारीला या शिबिराची सांगता होणार आहे. या शिबिरात प्रमुख प्रशिक्षक तुषार खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.









