रत्नागिरी :
जिल्ह्यातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्रातील अग्रेसर आभार संस्था संचलित माऊली महिला नमन मंडळाने महिलांना व्यासपीठ दिले आहे.
या नमनात पौराणिक ब्रह्मसत्य गण आणि मन्नाट विनोदी गौळणींनी नटलेले चौरंगी नमन २१ डिसेंबर रोजी स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे सादर करण्यात येणार आहे.
या नमन मंडळाने केवळ महिला कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी १४ ते ७५ वर्षापर्यत महिलांना संधी दिली आहे. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे सादर करण्यात येणाऱ्या या नमनाचे दिग्दर्शन नमनसम्राट यशवंत वाकडे असून निर्माता साईनाथ नागवेकर, नेपथ्य संतोष उर्फ बाबा आग्रे, सूत्रधार सागर मायगंडे, वासुदेव वाघे, माऊली महिला बुलबुलतरंग परशुराम मंडळाचा पुढाकार. घवाळी, ऑक्टोपॅड मांडवकर, की बोर्ड प्रवीण सावंतदेसाई, ढोलकी पार्टीज आंबेरकर यांची साथसंगत लाभली आहे.








