पायोनियर बँकेतर्फे महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार

महिला दिनानिमित्त दि पायोनियर अर्बन बँकेतर्फे बँकेतील महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन प्रदीप अष्टेकर, संचालक गजानन पाटील व सीईओ अनिता मूल्या यांनी कर्मचारी महिलांना पुष्पगुच्छ व मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या.
आराधना विशेष मुलांच्या शाळेत कार्यक्रम
बेळगाव : बेळगाव येथील सिद्धार्थ शिक्षण संस्थेच्या आराधना विशेष मुलांच्या शाळेत महिला दिनाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक गजानन सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या शांता सवदी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या जयश्र्र्री पाटील, सविता संबरगी, आराधना शाळेचा स्टाफ द्वारका पाटील, अश्विनी पवार, किशोरी जुवेकर व नंदा लोहार यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी द्वारका पाटील यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगितले. शाळेने बोलावून सन्मान केल्याबद्दल सत्कारमूर्तींनी मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले. कार्यक्रमास शाळेचे क्रीडा शिक्षक रशीदभाई, माऊती कुंभार, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार

शहर स्वच्छतेसाठी कष्ट घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना विविध योजनांचा लाभ व्हावा यासाठी महापालिकेत आवाज उठवून त्यांना मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नगरसेवक रवी साळुंखे यांनी केले. खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे बुधवारी खासबाग येथील समुदाय भवन येथे महिला दिनानिमित्त महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुण्या माजी उपमहापौर रेणू किल्लेकर होत्या. त्यांनी स्वच्छता कर्मचारी अनेकदा आपल्या आरोग्याचा विचार करीत नाहीत. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागतो. त्याची दखल घेत महिलांनी आपल्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले. खानापूर संघटनेचे माजी अध्यक्ष प्रेमानंद गुरव यांनी संघटना येणाऱ्या काळात महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले. माजी नगरसेवक नेताजी जाधव, मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, संघटनेचे माजी अध्यक्ष पी. जे. घाडी, सुहास शहापूरकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक कलावती आडीमणी यांनीही मनोगत व्यक्त केले. संघटनेचे सचिव सुरेश कळ्ळेकर यांनी प्रास्ताविक केले. नामदेव कोळेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला भारत नांदवडेकर, यल्लाप्पा कोलकार, प्रतीक गुरव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
सुवर्णलक्ष्मी को-ऑप. सोसायटी

सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटीतर्फे 115 वा जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. सुरेखा पोटे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन विठ्ठल शिरोडकर, व्हा. चेअरमन विजय सांबरेकर, संस्थापक मोहन कारेकर होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्थेच्यावतीने डॉ. सुरेखा पोटे यांचा सत्कार करण्यात आला. विठ्ठल शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले. विजय सांबरेकर यांनी समाज घडविण्यात महिलांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. मोहन कारेकर यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या. डॉ. सुरेखा पोटे म्हणाल्या, महिलांनी रोज किमान एक तास स्वत:साठी वेळ द्यावा. समाज सुधारण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने शिक्षण घेणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. प्रियांका कारेकर यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती शहापूरकर यांनी आभार मानले. यावेळी संचालक विनायक कारेकर, राजू बांदिवडेकर, विराज सांबरेकर, माणिक सांबरेकर, प्रकाश वेर्णेकर, विनया कारेकर, मनीषा कारेकर, शशिकांत कलघटकर, जयश्री धुडूम, प्रिती पाटील, माया चंदगडकर, दिपाली सांबरेकर, हेमा सांबरेकर यासह महिला सभासद उपस्थित होत्या.
नंदादीप हॉस्पिटलतर्फे महिलांचा सन्मान

महिला दिनाचे औचित्य साधून खानापूर रोडवरील डॉ. पटवर्धन यांच्या नंदादीप आय हॉस्पिटल येथे संपूर्ण मार्च महिना महिलांसाठी मोफत नेत्रचिकित्सा करण्यात येणार आहे. याच दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार नंदादीप हॉस्पिटल येथे करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग नियंत्रणाधिकारी डॉ. चांदनी देवडी, कन्नड आणि सांस्कृतिक खात्याच्या साहाय्यक संचालक विद्यावती बजंत्री, महानगरपालिकेच्या साहाय्यक अभियंत्या मंजुश्री, केएमएफच्या शोभा काडापुरीमठ व लोककल्प फौंडेशनच्या मालिनी बाली यांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी नंदादीपचे प्रशासक हिरय्या मास्तमर्डी यांनी सर्वांचे स्वागत केले. नंदादीपच्या डॉ. ज्योत्स्ना पाटील व नंदादीपचे रेटिना तज्ञ डॉ. चंद्रशेखर हिरेमठ यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन आनंद तुप्पद यांनी केले.
एसकेईतर्फे महिला पोलिसांचा सत्कार

एसकेई सोसायटीच्या आर.पी.डी. महाविद्यालय आणि महिला सशक्तीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त कम्प पोलीस स्थानकातील महिला अधिकारी व कर्मचारी महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्या डॉ. अनुजा नाईक, एसकेई सोसायटीच्या सदस्या बिंबा नाडकर्णी, महाविद्यालयाच्या महिला सशक्तीकरणच्या अध्यक्षा प्रा. शर्मिला संभाजी, प्रा. वैशाली हणमगोंड़, प्रा. हेमा अनगोळकर, प्रा. पूजा पाटील, प्रा. अमीना मुजावर, स्काऊट विभाग प्रमुख प्रा. सुरेश चौगुला आणि विद्यार्थी उपस्थित होते.
अरिहंत हॉस्पिटल

शहरातील अरिहंत हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. स्त्रियांना द्या इतका मान की, देशाची वाढेल शान, या म्हणीप्रमाणे महिला कर्मचाऱयांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हॉस्पिटलचे एमडी व सीईओ डॉ. एम. डी. दीक्षित होते. प्रारंभी महिला कर्मचाऱयांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर डॉ. दीक्षित यांनी आज महिला किती कर्तृत्ववान आहेत, याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमानिमित्त महिला कर्मचाऱयांच्या सन्मानार्थ त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी डॉ. अभिषेक जोशी, डॉ. अंबरिश नेर्लीकर, हॉस्पिटलचे व्यवस्थापक मल्लेश यड्डी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.









