प्रतिनिधी/ बेळगाव
येथील जोसअलुक्कासमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन शनिवारी साजरा झाला. साहाय्यक व्यवस्थापक राजेश, लेखा व्यवस्थापक दीपक, शिक्षण विभागाच्या राजेश्वरी, केरळ सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा चंद्रिका, डॉ. विनिता, जोसअलुक्कासच्या ग्राहक ऐश्वर्या यांची उपस्थिती होती. समाजात महिलांचे स्थान, महिला दिन साजरा करण्याचा उद्देश यावेळी सांगण्यात आला. महिलांचे सक्षमीकरण, महिला-पुऊष यांच्यात समानता, महिलांचे हक्क याबद्दल समाजात जागृती करून आणण्यासाठी हा दिन सार्वजनिकपणे साजरा करण्यात येत असल्याची माहिती यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांतून दिली.









