प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर येथे इनरव्हिल क्लबतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार करण्यात आला. क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
इनरव्हील क्लबतर्फे महिलांसाठी शिवणकाम व केक तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक महिलांनी या कार्यशाळेत सहभाग घेऊन प्रशिक्षणाचा लाभ घेतला. यानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थितीत असलेल्या डॉ. सोनाली सोरनोबत यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना बक्षीस वितरण करण्यात आले.
याप्रसंगी क्लबच्या अध्यक्षा शिल्पा, अध्याताई, कल्याणी, जोरापूर, कदम, मेघा कुंदरगी आदी उपस्थित होते.









