बर्मिंगहॅम इथं १८ जुलै रोजी पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी हरमनप्रीत कौर १५ सदस्यीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तसेच यस्तिका भाटिया ही यष्टिरक्षक असेल. याचबरोबर स्नेह राणा, हरलीन देओल आणि यष्टिरक्षक तानिया भाटिया यांचे संघात पुनरागमन झाले आहे. भारताची पहिली लढत २९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.