प्रतिनिधी / बेळगाव
श्री महिला क्रेडिट सौहार्द सहकारी संघ नियमित सोसायटीने गोल्याळी येथील मालतीबाई साळुंखे हायस्कूलला 13 सायकलींची भेट दिली. या शाळेतील काही विद्यार्थी दररोज 7 ते 8 कि. मी. प्रवास करून शाळेला येत होते. त्यांची पायपीट वाचावी या हेतूने सोसायटीच्या चेअरपर्सन प्रतिभा महेंद्र दडकर यांच्या पुढाकाराने या सायकली देण्यात आल्या.
याप्रसंगी सोसायटीच्या सीईओ तन्वी वेलंगी, अमृता पवार उपस्थित होत्या. मुख्याध्यापक के. एन. मन्नोळकर, कणकुंबी शाळेचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर, विजय नंदिहळ्ळी, लोककल्पच्या सीएसआर मॅनेजर मालिनी बाली आदी यावेळी उपस्थित होते.









