वृत्तसंस्था / सिडनी
ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या बिग बॅश लिग टी-20 स्पर्धेचे अजिंक्यपद ऍडलेड स्ट्रायकर्सने पहिल्यांदाच पटकावले. या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सने सिडनी सिक्सर्सचा 10 धावांनी पराभव केला.
या अंतिम सामन्यात ऍडलेड स्ट्रायकर्सने 20 षटकात 5 बाद 147 धावा जमवल्या. डॉटीनने 37 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 52 धावा झळकविल्या. त्यानंतर सिडनी सिक्सर्सचा डाव 137 धावात आटोपला.









