वृत्तसंस्था/ बेंगळूर
सलालाह, ओमान येथे शुक्रवारपासून महिलांची आशियाई हॉकी फाईव्ज विश्वचषक पात्रता स्पर्धा सुरू होत असून भारताची सलामीची लढत मलेशियाविरुद्ध होणार आहे.
भारताचा इलाईट गटात समावेश असून याच गटात जपान, मलेशिया व थायलंड यांचा तर दुसऱ्या चॅलेंजर्स गटात हाँगकाँग चायना, चिनी तैपेई, इंडोनेशिया, बांगलादेश, इराण व ओमान यांचा समावेश आहे. भारतीय महिला संघाचे नेतृत्व नवजोत कौरकडे असून ज्योती उपकर्णधार असेल. भारतीय संघ इलाईट गटातील संघांविरुद्ध खेळून टॉप दोनमध्ये स्थान मिळवित उपांत्य फेरी गाठण्याचा प्रयत्न करेल. मलेशियानंतर भारताच्या लढती जपानविरुद्ध शनिवारी, थायलंडविरुद्ध रविवारी सामने होतील. या स्पर्धेत पदक जिंकूनच भारतीय संघ मायदेशी परतेल, असा विश्वास कर्णधार नवजोतने व्यक्त केला.









