27 ऑक्टोबरपासून सुरुवात, भारताचा पहिला सामना थायलंडशी
वृत्तसंस्था/ रांची
आशियाई हॉकी महासंघ आणि हॉकी इंडियाने मंगळवारी रांची येथे 27 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या महिला खेळसडूंच्या आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. मलेशिया आणि जपान यांच्यात पहिला सामना खेळून स्पर्धेची सुऊवात होईल, तर यजमान भारत पहिल्या दिवसाचा तिसरा सामना मारंग गोमके जयपाल सिंग अॅस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम, रांची-झारखंड येथे थायलंडशी खेळेल.
हॉकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, रांचीत होणाऱ्या महिला आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत कोरिया, मलेशिया, थायलंड, जपान, चीन आणि भारत हे संघ उतरतील. सहा संघांच्या स्पर्धेला 27 ऑक्टोबर रोजी सुऊवात होईल आणि 5 नोव्हेंबर रोजी समारोप होईल. सर्व संघ एका गटाचा भाग असतील आणि अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील, जेथे गुणतालिकेत अव्वल स्थान मिळविणारा संघ चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाचा सामना करेल आणि दुसऱ्या वा तिसऱ्या क्रमांकावर आलेले संघ एकमेकांशी झुंजतील.
गतविजेत्या जपानसमोर 2010, 2011 आणि 2016 अशा सहापैकी तीन वेळच्या स्पर्धा जिंकलेल्या आणि या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वांत यशस्वी संघ राहिलेल्या कोरियाचे कडवे आव्हान असेल. यजमान भारतीय संघ विशेषत: बर्मिंगहॅम राष्ट्रकुल खेळातील ऐतिहासिक कांस्यपदक आणि स्पेनमध्ये गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेच्या प्राप्त झालेल्या विजेतेपदानंतर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. भारताने आशियाई चॅम्पियन्स चषक एकदा जिंकलेला आहे आणि 2018 मध्ये ते उपविजेते राहिले होते. 27 ऑक्टोबर रोजी थायलंडविऊद्ध त्यांच्या मोहिमेची सुऊवात होईल आणि 2 नोव्हेंबर रोजी गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात त्यांचा कोरियाशी सामना होईल.
आशियाई हॉकी महासंघाचे अध्यक्ष दातो फ्युमियो ओगुरा यांनी आशियाई हॉकीसाठी हा एक महत्त्वाचा प्रसंग असल्याचे म्हटले आहे. आम्ही महिलांच्या प्रतिष्ठित आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत अव्वल दर्जाचा हॉकी खेळ पाहण्यास उत्सुक आहोत. मी हॉकी इंडियाचे या स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल आणि आशियातील हॉकीच्या विकासासाठी त्यांचा अतुलनीय पाठिंबा आणि वचनबद्धतेबद्दल मन:पूर्वक कौतुक करू इच्छितो. शिवाय मी झारखंड राज्याचे आभार मानू इच्छितो, असे त्यांनी म्हटले आहे.









