कोल्हापूर प्रतिनिधी
हातकणंगले मधील रुकडीच्या यात्रेत महिला चोरट्यांना नागरिकांनी रंगेहात पकडले. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून दोघा महिला चोरट्यांकडे नागरिकांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी आपली चूक मान्य केली.नागरिकांनी या महिला चोरट्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले आहे .रुकडीच्या दर्गा परिसरात या चोरट्या महिलांना पकडले असून त्यांच्याकडून दोन चोरलेले मोबाईल ताब्यात घेतले आहे.दोघीही महिला नगरच्या असल्याची प्राथमिक माहिती आहे. करिष्मा ऋषीं भोसले व आयेशा अशोक भोसले अशी या महिलांची नावे आहेत.
Previous Articleसध्याच्या संयुक्त राष्ट्रसंघात जगाचे वास्तव नाही
Next Article आचरा-जामडूल येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या









