कथित सेक्स स्कँडलप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा इशारा
पणजी : कोणाही महिलांची नाहक बदनामी कऊ नये. तसेच कुणाच्या वैयक्तिक जीवनात नाक खुपसू नये, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंच-मंत्री यांच्या बदनामीची चौकशी सुऊ झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले की अशा प्रकारची विनाकारण बदनामी करणे पूर्णपणे चुकीचे असून ती यापुढे आपण खपवून घेणार नाही, असा इशारा डॉ. सावंत यांनी दिला आहे. डॉ. सावंत यांनी सागितले की सोशल मीडियाचा गैरवापर कोणी कऊ नये. त्यामुळे बदनामी होते. कोणतेही कारण नसताना अशी बदनामी होणे त्रासदायक ठरते. जनतेने देखील यावर विचार करण्याची गरज आहे. सेक्स स्कँडल प्रकरणी जे आरोप झाले यावर डॉ. सावंत यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.









