आज आगमन : परंपरेप्रमाणे काही घरांमध्ये सुगडावर किंवा तांब्यावर रेखाटन
प्रतिनिधी /बेळगाव
गणरायां पाठोपाठ शनिवारी गौराईचे आगमन होणार आहे. यंदा गौराईच्या स्वागतासाठी महिलावर्गाचा उत्साह अपूर्व आहे. बाजारपेठेत आठवडय़ाभरापासूनच गौराईचे मुखवटे दाखल झाले आहेत. उभ्या गौराई आणि फक्त मुखवटे यांची खरेदी महिलांनी केली आहे. तर परंपरेप्रमाणे काही घरांमध्ये सुगडावर किंवा तांब्यावर गौरी रेखाटन करण्यात आले आहे.
हळदीने सुगडावर आणि तांब्यावर गौराई रेखाटन केले जाते. त्यामध्ये गौराईच्या मुखासह विविध दागदागिने आणि अनेक शुभचिन्हे रेखाटली जातात. श्रावणात बसविलेल्या ज्ये÷ गौराईबरोबर भाद्रपदमध्ये कनि÷ा गौराईचे पूजन केले जाते. गौराई आणावयाच्या वेगवेगळय़ा पद्धती असून खडय़ाची, मुखवटय़ाची, तेरडय़ाच्या पानांची अशा अनेक पद्धतीने गौराई पूजल्या जातात.
मात्र विहिरीवर पूजा करुन गौराई कुमारिकांच्या हातून घरात आणल्या जातात. त्या मार्गावर पिवडीने गौराईची पावलेही रेखाटली जातात. गौराई येण्याच्या दिवशी भाजी-भाकरी असा साधा नैवैद्य असला तरी रविवारी गौराईच्या जेवणाचा थाट उडणार आहे. त्यासाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे.









