दरवर्षी करतेय कोट्यावधींची कमाई
स्थुलत्वामुळे ज्या महिलेची चेष्टा केली जात होती, तिने आता या आपत्तीला संधीत रुपांतरित केले आहे. स्वत:च्या स्थुल शरीराद्वारे ती आता दरवर्षी कोट्यावधी रुपयांची कमाई करत आहे. स्थुलत्व कुणासाठीच चांगले नाही, कारण स्थुलत्व अनेक आजारांना जन्म देत असते. याचमुळे डॉक्टर सर्वांना वजन कमी करण्यास सांगत असतात. परंतु अमेरिकेत राहणाऱ्या जेलिन चॅने हिने स्वत:च्या स्थुलत्वालाच कमाईचा स्रोत केले आहे. जेलिन दरवर्षी कोट्यावधी रुपये कमावत आहे. जेलिन अत्यंत स्थुल असून विमानाच्या एका सीटमध्ये ती सामावू शकत नाही. काही दिवसांपूर्वी तिने विमान कंपन्यांकडे केलेली मागणी चकित करणारी होती. ओव्हरवेट लोकांसाठी मोफत सीटची व्यवस्था असायला हवी, जेणेकरून त्यांना आरामात प्रवास करता येईल असे तिने म्हटले होते. परंतु आता तिने स्थुलत्वाद्वारे दर महिन्याला लाखो रुपये कमावत असल्याचा खुलासा करून सर्वांना चकित केले आहे.
कॅनडाच्या वँकुव्हरमध्ये राहणारी जेलिन एक इन्फ्लुएंसर असून ट्रॅव्हल-लाइफस्टाइल यासारख्या मुद्द्यांवर ती लोकांना माहिती देत असते. सोशल मीडिया साइट टिकटॉकवर तिचे 1,34,000 फॉलोअर्स आहेत. स्थुलत्वामुळे मला गुगल, मॅकडोनाल्ड्स, आफ्टरपे, पॉशमार्क आणि हिल्टन हॉल्टेसकडून अनेक करार प्राप्त झाल्याचे तिने सांगितले आहे. या ब्रँड्सकडून तिला मोठी रक्कम प्राप्त होत आहे. याचबरोबर टिकटॉकवरील स्वत:च्या व्हिडिओंद्वारे ती हजारो डॉलर्स दर महिन्याला कमावत आहे. स्थुल असूनही पैसे कशाप्रकारे कमाविले जाऊ शकतात याच्या टिप्स मी लोकांना देत आहे. जर तुमचे वजन जर कमी होत नसेल तर तुम्ही याला संधीत रुपांतरित केले पाहिजे. जेव्हा मी पहिला व्हिडिओ अपलोड केला होता, तेव्हा एक दिवस व्हायरल होईन आणि अब्जावधी ह्यूज प्राप्त होतील, याची कल्पना नव्हती असे तिने सांगितले आहे. स्थुल असल्याने कशाप्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते हे मी लोकांना सांगते. हॉटेलने स्वत:ची टॉयलेट सीट उंच कराव्यात आणि प्रत्येक खोलीत हँडहेल्ड शॉवरचा हेड लावावा जेणेकरून स्थुल शरीर असणारे लोक सहजपणे सुविधांचा वापर करू शकतील. विमानांमध्ये मजबूत सीट्स असाव्यात, पूलमध्ये रेलिंग लावण्यात यावे, जेणेकरून लोक शांततेत आराम करू शकतील. लिफ्टचा आकारही अधिक असायला हवा असे तिने म्हटले आहे.









