झोपलेले पाहण्यासाठी लोक देतात पैसे
एक महिला केवळ झोपेत लाखो रुपये कमावत आहे. ही एक कंटेंट क्रिएटर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असून तिला झोपलेले पाहण्यासाठी लोक लाखो रुपये खर्च करत आहेत. ब्राझीलमधील 32 वर्षीय इन्फ्लुएंसर डेबोरा पिक्सोटो ही अनोख्या स्ट्रीमिंगमुळे चर्चेत आहे. डेबोराचे चाहते झोपलेले पाहण्यासाठी पैसे खर्च करतात. लोक रात्रभर झोपलेले लाइव्ह पाहण्यासाठी 84 पाउंड (सुमारे 9500 रुपये) खर्च करण्यास तयार आहेत, असे सांगत डेबोराने याला ‘नाइट टाइम रियलिटी शो’ नाव दिले आहे. यात दररात्री सुमारे 40 लोक तिच्या झोपेचे लाइव्ह दृश्य पाहतात.

प्रारंभी हा प्रकार मला अजब वाटला, परंतु प्रेक्षकांना वेगळ्या प्रकारची शांतता आणि आपलेपणा जाणवत असल्याचे कळले. अनेक पुरुष मेसेज पाठवून माझ्या झोपेचे दृश्य दाखविण्याची मागणी करत होते. हीच मागणी पाहता मी याला एक कमर्शियल प्रॉडक्टमध्ये बदलण्याचा निर्णय घेतल्याचे ती सांगते. डेबोराने स्वत:च्या खोलीला अशाप्रकारे सजविले आहे की ही एक सिक्युरिटी कॅमेरा फुटेजसारखी दिसेल. मंद प्रकाशयुक्त खोली, फिक्स्ड कॅमेरा अँगल, कुठलेही पार्श्वसंगीत नाही, पूर्ण सेटअप असा जणू कॅमेरा थेट तिच्या बेडरुममध्ये लावलेला असेल.
लोक खर्च करतात पैसे
ही संकल्पना विचित्र असली तरीही डेबोराने खासीगत्व सुरक्षित ठेवण्याचे सुनिश्चित केले आहे. पुर्ण स्ट्रीमिंग सिस्टीम तिच्याच नियंत्रणात आहे आणि कुणीही तिच्या खासगीत्वाला धक्का पोहोचविणार नाही अशाप्रकारे याचे डिझाइन करण्यात आले आहे. 40 हून अधिक सब्सक्रिप्शन विकले असून ही संख्या सातत्याने वाढत आहे. हे प्रेक्षक रॉयल असून ते वारंवार या अनोख्या सेवेचा हिस्सा होऊ इच्छितात, असे ती सांगते.









