पित्याच्या चितेच्या राखेपासून तयार करते सिगारेट
स्वत:च्या पित्याच्या चित्याच्या राखेपासून सिगारेट तयार करत ती ओढत असल्याचे कुणी सांगितले तर तुमचे त्याच्याबद्दलचे मत निश्चितपणे सकारात्मक नसेल. अशा इसमाची मानसिक स्थिती बरी नसेल किंवा तो एखाद्या प्रकारचा सूड उगविण्यासाठी असे करत असेल असा विचार येऊ शकतो. परंतु एका युट्यूबरने यासंबंधीची एका पॉडकास्टमध्ये कबुली दिली आहे. प्रसिद्ध रोसन्ना पँसिनो असे या महिला युट्यूबरचे नाव आहे. तिने अलिकडेच नव्या व्हिडिओत स्वत:च्या पित्याच्या अंतिम इच्छेविषयी खुलासा केला आहे. स्वत:च्या वडिलांयच अस्थींवर गांजाचे रोप उगविले आहे. माझे वडिल एक बंडखोर व्यक्ती होते. मी देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा निर्णय घेतला आहे असे रोसन्ना सांगते.
स्वत:च्या चितेच्या राखेसोबत काय केले जावे हे माझ्या वडिलांनी सांगितले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे राखेला मातीत मिसळवून एक मारिजुआनाचे रोप उगविण्याचा निर्णय घेतला. माझ्या वडिलांचा मृत्यू पाच वर्षांपूर्वी ल्यूकेमियामुळे झाला होता असे रोसन्नाने सांगितले आहे. रोसन्ना आणि तिच्या आईने गांजाचे रोप उगविणाऱ्याशी संपर्क साधला होता. घरातच पित्याच्या राखेवर रोप उगविण्यात आले. यादरम्यान अनेक छायाचित्रे अन् व्हिडिओ तयार करण्यात आले. हा क्षण आमच्यासाठी अत्यंत भावनात्मक आणि खास होता. वडिलांची इच्छा पूर्ण करू शकले याचा आनंद आहे असे तिने म्हटले आहे. रोसन्नाने अलिकडेच या रोपाला कापून त्याला सिगारेटच्या स्वरुपात रोल केले. गुलाबी रोलिंग पेपरद्वारे निर्मित ही सिगारेट माझ्यासाठी खास होती असे रोसन्नाने सांगितले आहे.









