Iran Hijab Protest : इराणमध्ये हिजाब वादाला आता वेगळे वळण लागले आहे. काही दिवसापूर्वी हिजाब विरोधी आंदोलनात एक तरूणी आपले मोकळे केस बांधतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता या तरूणीची हत्या झालेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एका रिपोर्टनुसार तिच्या पोटात, मानेवर, हाथावर, छातीत गोळ्या मारल्याचे समोर आले आहे. तिच्या कब्रीजवळ असलेला फोटो पाहून इराणी लोकांना अश्रु अणावर झाले आहेत. या घटनेने इराणमध्ये महिला आणखी आक्रमक झाल्या आहेत.
इरानमध्ये २२ वर्षीय महसा अमीनीचा पोलीस कस्टडीत असताना मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर इराणी महिला रस्त्यावर उतरल्या. इराणमध्ये महिलांना हिजाब घालणं बंधनकारक आहे. या आठवड्यात लंडनमध्ये देखील महिला महसा अमीनीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत.
इराणमध्ये हिजाब आंदोलनात आतापर्यंत ४१ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर ७०० जणांना अटक झाली आहे. जवाद हैदरी या व्यक्तीचा या आंदोलनात मृत्यू झाला. त्याच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओत एकीकडे महिला फूल वाहत आहेत तर दुसरीकडे त्यांची बहिण तिचे केस कब्रीवर कापत असताना दिसत आहे. इरानी महिला आपले केस कापून दु:ख आणि राग व्यक्त करत आहेत अस पत्रकारआणि कार्यकर्त्या मसीह अलीनेजाद यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









