कागल / प्रतिनिधी
येथील शाहू हायस्कूल समोर असलेल्या पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन कोल्हापूरच्या दिशेने चालत चाललेल्या महिलेला अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने महिला जागीच ठार झाली. श्रीमती ज्योती अक्षय समुद्रे ( वय २० . रा . पिंपळगाव खुर्द ता . कागल ) असे मृत महिलेचे नाव आहे .
गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ज्योती समुद्रे या कामानिमित्त कागलला आल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गावरून चालत जात असताना शाहू हायस्कूल समोर आले असता पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने ज्योती समुद्रे यांना जोराची धडक दिली . या धडकेत ज्योती समुद्रे या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालका विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रविकांत गच्चे हे करीत आहेत.
चारच महिन्यापूर्वी ज्योती यांच्या पतीचे निधन झाले आहे . या धक्क्यातून सावरत असतानाच काळाने ज्योती यांच्यावरच घाला घातला . त्यामुळे पिंपळगाव खुर्द सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









