जणू डोक्यावर कुणी बंदुक ठेवल्यासारखे वाटते
एका महिलेला टोमॅटो केचअपशी इतकी भीती वाटते की जणू काही एखाद्याने डोक्यावर बंदुक ताणली असल्याचे तिला वाटते आणि ती अत्यंत घाबरून जाते. केचअप पाहताच तिला पॅनिक अटॅक येतो. अखेर या महिलेला टोमॅटो केचअपबद्दल अशाप्रकारचा फोबिया का आहे असा प्रश्न उपस्थित होतो.
ब्रिटनमध्ये राहणारी ली वुडमॅनने स्वत:च्या एका अजब प्रकारच्या फोबियाविषयी सांगितले आहे. हा प्रकार ऐकून प्रथमदर्शनी कुणी याला चेष्टा समजेल, परंतु वुडमॅनसाठी हे एक गंभीर प्रकरण आहे. जेव्हापासून मला आठवते, मला केवळ केचअपपासून दूर रहावे लागले आहे. तसेच अनेक लोकांनी माझी चेष्टाही केली आहे, हे लोक माझ्या पीडेला गांभीर्याने घेत नाहीत.
पॅनिक अटॅक
या टोमॅटोच्या डिपच्या संपर्कात आल्याने ब्रिस्टल येथील महिलेला पॅनिक अटॅक येतो. तिने स्वत:च्या घरात केचअप आणण्यावर मनाई केली आहे. केचअप आसपास असल्याचे कळल्यावर ती त्याकडे बघणे टाळले आणि निश्चितपणे याच्या संपर्कात आलेल्या कुठल्याही भांड्याला ती फेकून दिले, कारण याच्या प्रभावापासून तिला भीती वाटते. 32 वर्षीय वुडमॅनने सोशल मीडिया फॉलोअर्ससमोर एका व्हिडिओत मान्य केली की आपण केचअपची बाटली देखील पाहू शकत नाही आणि तसेच त्याला स्वत:च्या आसपास ठेवू शकत नाही. या व्हिडिओला 10 लाखाहून अधिक ह्यूज मिळाल्या आहेत. हे किती नाटकी वाटेल हे मला पूर्णपणे माहित आहे आणि याबद्दल माझ्या मनात नेहमीच न्यूनगंड राहिला आहे. जर कुणी माझ्या चेहऱ्यावर केचअप फेकला तर मला बंदूकीच्या समोर उभे केल्यासारखे वाटते, या पातळीपर्यंत मी घाबरून जाते, असे ती सांगते.
भीतीचे कारण माहित नाही
हा प्रकार कसा सुरू झाला हे मलाच माहित नाही. लहानपणी मला फ्रेंच फ्राय आणि केचअप अत्यंत आवडायचे, असे आई सांगते. याचमुळे केचअपचा फोबिया कसा सुरू झाला हे ठाऊक नाही. मी कधीच स्वत:हून केचअपकडे पाहत नाही. जर खोलीत केचअप असेल तर त्याकडे पहायचे नाही हे मला माहित असते असे वुडमॅन सांगते.
गंध अन् स्वरुप नापसंत
केचअपचा गंध अन् स्वरुप अत्यंत खराब असल्याचे मला वाटते. सर्वसाधारणपणे मला टोमॅटो पसंत नाही, परंतु कुठल्याही अन्य टोमॅटो उत्पादनावर कॅचअपसारखा प्रभाव पडत नाही. जर कुणी माझ्या चेहऱ्यावर केचअप लावले तर मी आजारी पडेन. याच्या गंधाने देखील मला आजारीपणाचा अनुभव येतो. केचअप माझ्या डिशवॉशरवर फैलावेल ही मला सर्वात मोठी भीती आहे. यामुळे मी कुठलीही प्लेट किंवा कटलरी पुन्हा कधीच वापरू शकणार नाही, असे वुडमॅनने म्हटले आहे.









