आयुष्याची कहाणी फार विचित्र अन् आश्चर्यकारक
सौंदर्य वाढवण्यासाठी लोक काय-काय शक्कल लढवतील हे सांगता येत नाही. अनेक प्रकारच्या क्रीम्स आणि पावडर वापरण्याबरोबरच लोक देशी आणि घरगुती उपायही करून बघतात. याशिवाय काही लोक अफाट पैसा खर्च करत प्लास्टिक सर्जरी करून घेण्यास मागेपुढे पाहत नाहीत. प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून आपला लूक बदलण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. आजकाल अशीच एक महिला चर्चेत आहे, जिने आपले सौंदर्य वाढवण्यासाठी प्लास्टिक सर्जरी केली आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही सर्जरी करण्यासाठी तिने स्वत:चे घर विकल्याचा प्रकार उघड झाल्याने भुवया उंचावल्याशिवाय राहत नाहीत.
व्हिक्टोरिया मार्श असे या महिलेचे नाव आहे. 33 वषीय व्हिक्टोरियाने आपली जीवनकहाणी शेअर केल्यानंतर लोकही हैराण झाले आहेत. व्हिक्टोरियाने नुकतीच ब्र्रेस्ट रिडक्शन सर्जरी केली आहे. पूर्वी तिचा आकार खूप मोठा होता, अशा परिस्थितीत तिला अनेकदा अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अनेकदा त्यांच्या छातीत वेदनाही होत होत्या. याशिवाय त्यांना फिटिंगचे कपडे मिळत नसल्याचीही समस्या होती. मग तिने शस्त्रक्रियेद्वारे स्वत:चा आकार कमी करण्याचा निर्णय घेतला. मार्घ्, शस्त्रक्रिया करण्यासाठी लाखो रूपयांची गरज असल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते. व्हिक्टोरियाचा नवरा एका कंपनीच्या सेल्स विभागात काम करतो, पण तोही आपल्या नोकरीतून शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरेसे पैसे पुरवू शकत नव्हता. अशा परिस्थितीत व्हिक्टोरियाने खूप विचार करून आपले घर विकण्याचा निर्णय घेतला. तिच्या शस्त्रक्रियेसाठी 10 लाख रूपये खर्च झाले आहेत. आता आपले आयुष्य खूप आरामात जात असल्याचे ती सांगते. मात्र, शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती आता पती आणि मुलांसह भाड्याच्या घरात राहते.