शिरोळ : प्रतिनिधी
ट्रॅक्टरने नागर करत असताना महिलेचा सडलेला साफळा मिळून आला. नांदणी (ता. शिरोळ) येथील माणगावकुडीत मिळालेला हा मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने जागेवरच पंचनामा करण्यात आला. अज्ञात महिलेचा सापळा मिळून आल्याने नांदणी परिसरात खळबळ माजली असून या महिलेची हत्या की अन्य कारणाने मृत्यू याचा तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, वर्दीदार राकेश आप्पासो पाटील हे माणगावकुडी येथे ट्रॅक्टर घेवून नांगरणीसाठी गेले होते. शाळू पिकाची पेरणी करण्यासाठी ट्रॅक्टरने नांगरट करत असताना नागरणीच्या फाळ्याला मातीतून मानवी कवठी मिळाली. या कवठीपासून ठिकठिकाणी हाडे, काळे पांढरे डोक्यावरचे केस, साडी, परकर ,ब्लाऊज, स्टीलचा डबा, किटली पाच नंबरचे चप्पल जोड यास अन्य वस्तू मिळून आल्या आहेत डब्यावर गंगुबाई कोळी असे नाव कोरलेले आहे
अशा वर्णनाची स्त्री जातीची व्यक्ती बेपत्ता झाली असल्यास संबंधितानी शिरोळ पोलीस ठाण्याचे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी केले आहे.









