बीड
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहेत. या घटनांना बीड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी गांभीर्याने घेतले असून गुन्हे दाखल केले आहेत.
बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. एकीकडे बीडमधील गुन्हेगारीचा वाढता उल्लेख समोर येत असतानाही जिल्ह्यातील गुन्हेगारीची नवनवी प्रकरणे दररोजी उघडकीस येत आहेत.
अशातच बीडमधील युसुफ वडगाव पोलिस स्टेशनच्या बाहेर आज एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणात लगचेच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टाळला. एका महिलेने पोलिस स्टेशन बाहेर येऊन ज्वलनशील पदार्थ ओतून घेतल्याने, आता हे नेमकं काय प्रकरण आहे, याकडे सर्वांची नजर आहे.








