कोल्हापूर :
कोल्हापूर–हुपरी रस्त्यावरील टेंबलाईवाडी येथे मोपेडवऊन जाणाऱ्या एका दाम्पत्याला भरधाव अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत मेपडेवरील जयश्री भीमराव घाटगे (वय 57, रा. माळी कॉलनी, टाकाळा, कोल्हापूर) ही विवाहिता जागीच ठार झाली. तिचा पती भीमराव बाबूराव घाटगे (वय 65) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शहरातील एका खासगी ऊग्णालयात दाखल केले आहे. हा अपघात सोमवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडला आहे. अपघातानंतर या रस्त्यावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. यांची नोंद राजारामपूरी पोलिसात झाली असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने अपघातानंतर घटनास्थळावऊन पळून गेलेल्या त्या वाहनाचा आणि त्यांच्या चालकाचा शोध सुरु केला आहे.
घाटगे दाम्पत्य सोमवारी सकाळी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील नातेवाईकांच्या साखरपुड्याच्या समारंभासाठी गेल्या होते. दुपारी साखरपुड्याच्या समारंभानंतर हे दाम्पत्य कोल्हापूर–हुपरी रस्त्यावऊन मोपेडवरून घरी जात होते.
यावेळी त्यांच्या मेपेडेला या रस्त्यावरील बागल विद्यालया नजीक पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेनंतर जयश्री घाटगे रस्त्यावर पडल्याने, त्याच्या अंगावऊन चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर तिचे पती रस्त्याच्याकडे उडून पडल्याने गंभीर जखमी झाले. घटनास्थळी धाव घेतलेल्या काही तरुणांनी त्यांना उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात तत्काळ दाखल केले.
या अपघाताची माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस ठाण्याचे आणि कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करीत, अपघातस्थळी बघ्यांनी केलेली मोठी गर्दी हटवून, या मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत सुरु केली.
- मृतदेह बराच वेळ रस्त्यावर
अपघातास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जयश्री घाटगे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर ऊग्णालयात नेण्यासाठी महानगरपालिकेच्या शववाहिकेला फोन केला. पण महानगरपालिकेची शववाहिका वेळेत घटनास्थळी दाखल झाली नाही. त्यामुळे सुमारे पाऊण तास मृतदेह रस्त्यावरच होता. त्यामुळे नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला.








