कोल्हापूर: करवीर तालुक्यातील वडणगे इथल्या तलावात उडी मारत एका महिलेने आपल्या सहा महिन्याच्या तान्हुल्यासह आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत महिलेचा जीव वाचवण्यासाठी स्थानिकांना यश आले असले तरी, चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस आणि जिल्हा पत्ती व्यवस्थापन दलाचे जवान दाखल झाले आहेत. ही महिला परप्रांतीय असल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Previous Articleवडणगे तलावात महिलेची तान्हुल्यासह उडी, दुर्दैवी बाळाचा मृत्यू
Next Article महाराष्ट्रात आजपासून यलो अलर्ट









