मिरज :
टाटा मोटर्स कंपनीच्या नावाने फ्रांचायजी देण्याचे अमिष दाखवून मिरजेतील महिलेला 33 लाख, 74 हजार, 500 रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला.
याबाबत आरती अरविंद जोशी (रा. अॅथेनियल कॉलनी, पंढरपूर रोड, मिरज) यांनी मिरज शहर पोलिसात तक्रार दिली आहे. अनोळखी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आरती जोशी यांना टाटा ग्रुपची फ्रांचायजी घ्यायची होती. अनोळखी व्यक्तींनी आपण टाटा ग्रुप कंपनीच्या झुडीयो या ब्रँडचे अधिकारी असल्याचे सांगितले. सदर कंपनीकडून फ्रांचायजी व लायसन्स मिळवून देतो, असे अमिष दाखविले. जोशी यांना बनावट सर्टीफिकेट व लायसन्स देऊन विश्वास संपादन केला. वेळोवेळी बँक खात्यावर भामट्यांनी 33 लाख, 74 हजार, 500 ऊपये जोशी यांच्याकडून घेतले.
पैसे देऊन सहा महिने होऊनही प्रत्यक्ष फ्रांचायजी मिळाली नाही. कोणत्याही प्रकारची वाहनेही विक्रीसाठी मिळाली नाहीत. लायसन्स आणि फ्रांचायजी सर्टीफिकेटही बनावट असल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरती जोशी यांनी शहर पोलिसात धांव घेऊन तक्रार दिली आहे. संपर्क करणाऱ्या संबंधीत संशयीतांच्या मोबाईल क्रमांकावऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत.








