‘त्या’ पोलिसावर कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : निवृत्त पोलिसाकडून एका महिलेला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे. पतीने पैसे घेतले आहेत. ते पैसे आम्हाला परत कर, असा तगादा लावून तिला जेरीस आणणाऱ्या त्या निवृत्त पोलिसाच्या विरोधात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. जया अनिल बांदेकर या महिलेच्या पतीने मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये या प्रयत्नामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला. तर पती त्यामधून बचावला. सध्या तो कारागृहात शिक्षा भोगत आहे. तरीदेखील निवृत्त पोलीस त्या महिलेला नाहक त्रास देत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
व्याजासाठी तगादा
आम्ही तुम्हाला 11 लाख रुपये दिलो आहे. त्याचे व्याज द्या, म्हणून तगादा लावत आहे. जया ही आता आपल्या वडिलांकडे एका मुलासह राहते. त्या ठिकाणी जाऊन सदर निवृत्त पोलीस त्रास देत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. व्याजाने पैसे देणे हा गुन्हा आहे. पैसे दिला की नाही त्या महिलेलाही माहिती नाही. असे असताना त्रास देत असल्यामुळे संबंधित निवृत्त पोलिसाला सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी नागेश माने, जया बांदेकर व इतर नागरिक उपस्थित होते.









