जलजीवन मिशन योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप ; कारवाईशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार
मुंबई –
निरवडे येथील जलजीवन मिशन योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात निरवडे येथील श्रीमती गावडे यांनी आझाद मैदान, मुंबई येथे उपोषण सुरू केले आहे. या योजनेतील उप अभियंता राणे यांची उचलबांगडी करून तातडीने कारवाई करण्यात यावी, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्री. तनपुरे यांच्यावर निलंबनासह फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गावडे यांनी केली आहे.उपोषणाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी देऊन चर्चा केली, मात्र कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार श्रीमती गावडे यांनी व्यक्त केला आहे.जलजीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप श्रीमती गावडे यांनी केला आहे.या योजनेत निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.उप अभियंता राणे यांची तातडीने उचलबांगडी करण्यात यावी ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी तनपुरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.जलजीवन मिशन योजनेतील कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी गावडे यांची मागणी आहे









